समता पर्वात ‘अनुसूचित जाती उत्थान; दशा आणि दिशा ’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्व’च्या औचित्याने ‘उत्थान; दशा आणि दिशा ’या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.समता पर्वाचे औचित्य साधुन  26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर, 2022 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्ह्यातील अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग यांची  ‘अनुसूचित जाती उत्थान; दशा आणि दिशा ’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे होणाऱ्या या कार्यशाळेस सकाळी 11:00 वाजता समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *