प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहरातील गवळीवाडा येथे समजाविण्यासाठी गेले असल्याचा राग आल्याने फायटरने मारुन दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील गवळीवाडा येथे लग्नात नाचत असतांना साक्षीदार सागर कोतवाल यास धक्का लागला . यावेळी मनोज महादू गवळी हे समाजाविण्यासाठी गेला . याचा राग आल्याने दादू सिताराम भोई , धिरज दिलीप भोई , रामू बापू मराठे व कृष्णा दिलीप भोई यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली .
तसेच दादू भोई याने फायटरने मारुन दुखापत करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत मनोज गवळी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . अतुल बिऱ्हाडे करीत आहेत .
Users Today : 30