नांदुरा प्रतिनिधी ( शुभम ढवळे ) ||
शिवरायांचे आठवावे रूप| शिवरायांचा आठवावा प्रताप|| ‘समर्थ रामदासांच्या’ ह्या ओळी! खरोखरचं शिवरायांचे कार्य हे अद्वितीय आहे. शिवरायांचा इतिहास शिवरायांनी ‘हिंदवी स्वराज्याची’ स्थापना केली, या एका ओळीपुरता मर्यादित नाहीच! यासाठी लागणारे बळ, लढाया,बलिदान, युक्त्या पराक्रम..! अश्या कितीतरी अगिनीत गोष्टींचा यात समावेश आहे. असाच एक पराक्रम म्हणजे ‘अफजल खानाचा वध’! अफजल खानाने रायतेचे शोषण करून खुप अन्याय केले. अंगात दहा हत्तीचं बळ आहे असे म्हटल्या जाणाऱ्या अफजल खान शिवरायांनी अवघ्या दोन मिनिटांनी जमीनदोस्त केला. मार्गशिष महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजेच काल बुधवार या प्रतापाला ३६३ वर्ष पुर्ण झाले. दरवर्षी शिवप्रेमींनीकडुन प्रतापगडावर साजरा होणारा शिवप्रतापदिन यावर्षी पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणजेच ‘शासनातर्फे’ प्रतापगडावर साजरा करण्यात आला.नांदुरा शहरातील शिवप्रेमींनी सुद्धा शिवप्रतापदिन ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ येथील ‘शिवस्मारक’ येथे साजरा केला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा, आरती व प्रसाद वाटप करण्यात आले. जितु मोरे यांनी सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिवप्रताप दिनाबद्दल माहिती दिली. सौ. सरिताताई बावस्कार, व सौ. प्रज्ञाताई तांदळे यांनी उपस्थित सर्व शिवप्रेमी मुला- मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व शिवप्रेमी मुला-मुलींनी शिवरायांचे विचार आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करण्याचे आश्वासन दिले. वेदांत वाणी यांनी सर्वांना रक्तदानचे महत्व सांगितले त्यांचबरोबर युवा ग्रुप कडुन ४ डिसेंबर रोजी असलेल्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी भावना सोनटक्के , विजया गोरे , अंबिका महादेव तांदळे, मंगलाताई सपकाळ , सपना रूम, वाकुलकर ताई , रुपाली घोपे , भाग्यश्री तांदळे, स्वाती पारधी,खुशी लाहुडकर,प्रगती इंगळे,हंसिका नरडे,अंबिका तेलकर,राधा वसाने,संजना खेते,अभिमन्यू राखोंडे,प्रकाश बावस्कार,संजू मात्रे,अनिरुद्ध साळुंके,महेश उंबरकर, पवन जांगळे,महादेव सपकाळ,प्रथमेश आडोळकर,श्याम बावणे,विशाल राखोंडे,संस्कार बरालिया,उद्धव पंढरकर,श्याम बावणे आणि असंख्य शिवप्रेमी मुले, शिवकन्या मुली,माहिला,पुरुष, जेष्ठ नागरिक, समाजसेवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
Users Today : 0