भवानी माता मंदिर परिसर प्रांगणामध्ये करण्यात आले होते आयोजन
योगेश नागोलकार पातुर
येथील सेवानिवृत्त ग्राम विस्तारक अधिकारी जेष्ठ साहित्यिक जी. एम. देशमुख उर्फ दास गोविंद यांच्या “भारताचे कोहिनूर नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील भवानी मंदिर जवळील भव्य प्रांगणामध्ये आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. दिपाली आतिष सोसे तर कार्यक्रमाचे उदघाटक पिंपळखुटा येथील ज्येष्ठ विचारवंत प्रल्हादजी दांदळे तर प्रमुख अतिथी म्हणून अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक देवानंद गहिले, सुप्रसिद्ध कवी अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक डॉ. शांतीलाल चव्हाण, अंकुर साहित्य संघाचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे
प्रा एस. एन. तायडे , सरपंच सौ अलका सुभाष वाहोकार, सौ विजया देशमुख, सौ मंगला वानखडे, जगन्नाथ खरप ,सौ मंगला दांदळे यांची उपस्थिती कार्यक्रमाला मंचावर उपस्थिती होती.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे , कवी कलावंत देवानंद गहिले, प्राध्यापक दिपाली सोसे यांनी आपले विचार व्यक्त करून भारताचे कोहिनूर नरेंद्र मोदी या काव्यसंग्रहाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून पातुर तालुक्यातील लेखक कवी मित्रांना लेखनाबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर बोदडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ दिपाली धनोकार यांनी देशमुख परिवार आणि दांदळे परिवार यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि आयोजकांनी पुष्पमाला देऊन व्यक्त केले.यावेळी एकनाथ दांदळे, विश्वनाथ दांदळे, गजानन तांदळे संदीप दांदळे, संजय दांदळे, कपिल खरप, बाबाराव कव्हर, पंडितराव देशमुख, राजू देशमुख, सारंगधर फाळके, श्रीराम धोत्रे, तुळशीराम बोदडे, शिवहरी घ्यार,रामभाऊ लांडे, श्रीकृष्ण सुरडकर, अनंता भाऊ अंधारे, ढोरे आदी सह इतर मान्यवर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ आदींची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
Users Today : 39