ता . प्रतिनिधी देऊळगाव राजा
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषि महाविदलाय देऊळगाव राजा येथे जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालचे प्राचार्य नितीन मेहत्रे हे अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा. अश्विनी जाधव यांनी एड्स जनजागृती संदर्भात हा आजार होण्यामागील कारणे, त्याविषयी समाजात असणारे गैरसमज आणि उपाययोजना या बद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन मेहेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो व एड्स बाबत समाजात जनजागृती करणं आणि या आजाराबाबतचे समज-गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हा दिवस पाळला जातो असे सांगितले. जागतिक स्तरावर एड्स हा एक भयंकर आजार असल्याने त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काय केले जाऊ शकते याची माहिती उपस्थितांना दिली. समानता या थीम वर आधारित यंदाचा एड्स दिन पाळला जाणार आहे असे देखील सांगितले, सोबतच कु. सारिका पादीर या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री निलवाल तर आभार प्रदर्शन कु सारिका पादीर यांनी केले. तसेच मविद्यालायमध्ये एड्स दिनानिमित्य निबंध स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, रांगोळी स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जनजागृतीत पुढाकार घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शुभम काकड रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. लिकेश मेश्राम, सह कार्यक्रम अधिकारी, प्रा.मोहजीतसिंह राजपूत, प्रा नारायण बोडखे, प्रा. अरविंद देशमाने,प्रा.सचिन सोळंकी, प्रा.सचिन गोरे, प्रा. सोनाली इंगळे, प्रा.सीताबाई ढाकणे आणि विद्यार्थी पियुष बोधे, अथर्व लांबट, कु. साक्षी काळे , कु.पूर्वा इंगळे यांनी प्रयत्न केले.
Users Today : 0