फर्दापूर येथे जागतिक एच,आय,व्ही एड्स दिन साजरा

Khozmaster
2 Min Read
जन जगृती हाच एच,आय,व्ही,एड्स वर प्रभावी उपाय; डॉ.श्रीनिवास सोनवणे 
 
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे जागतिक एड्स दिना निमित्त आरोग्य उपकेंद्रात डॉ श्रीनिवास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर माता व इतर लोकांची एच आय व्ही तपासणी व सी.बी.थायराॅईड रक्तातील साखर इत्यादी तपासण्या करण्यात आल्या आहे.एके काळी जगात थैमान घालणाऱ्या एच,आय, व्ही,एड्स वर उपाय नव्हता मात्र जागतिक आरोग्य संघटना,व देशातील प्रभावी उपाय व जन जागृती यामुळे या आजारावर नियंत्रण प्राप्त झालेले आहे, मात्र आजही देशात लाखोंच्या संख्येने व जगात ही मोठया प्रमाणात एच ,आय, व्ही,एड्स बाधित आहेत, आणि तेव्हढ्याच प्रमाणात एड्स बाधितांचे मुलं-मुली आहेत, या मुलामुलींचे पुनर्वसन ही फार मोठी जबाबदारी समाजाची,सामाजिक संस्था ब शासनाची आहे,आजही समाजात एच आय व्ही एड्स बाधित आहेत,एचआयव्ही एड्स बाबत आजही जाणीव जागृतीची गरज आहे, समाजात आजही पाहिजे तशी जागृती नाही, गोरगरीब,वाहनांचे चालक,ट्रक चालक,काही शौकीन यांना या आजाराबाबत परिपुर्ण व सखोल माहिती या आजाराबाबत  देणे गरजेचे आहे,ट्रकचालक हे महिनो महिने बाहेर राहतात, त्यांच्यात या आजाराच्या भयानकतेची माहिती,त्यांच्या शी चर्चा करून,संवाद साधून,त्यांचे समुपदेशन करून
जागृती शक्य आहे,देशाच्या ग्रामीण भागात युवा वर्ग
मोठ्या संख्येने आहे,यास्तव ग्रामीण भागात ही या बाबत जागृती गरजेची आहे,हा आजार स्पर्शाने, एच,आय,व्ही,बाधित सोबत राहिल्याने होत नाही एड्सवर  अद्याप प्रभावी औषध जरी नसले तरी तो होऊ नये यासाठी सावध गिरी हवीच ,बाहेरख्यालीपणा स्त्री व पुरुषांनी टाळावा, दाढी,कटिंग साठी सलुन मध्ये गेल्यावर नवीन ब्लेड वापरण्याबाबत संबधीतास सुचविणे,रुग्णालयात इंजेक्शन घेताना नवीन सुई वापरणे,एड्स बाधित महिला गर्भवती असल्यास पोटातील बाळाला एड्स होतो म्हणून गर्भपात करणे,एड्स ग्रस्तांचे ब्रश,ब्लेड वापरू नये, “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक”,हे सूत्र महिला पुरुषांनी बाळगणे ही काळाची गरज आहे अशे मार्गदर्शन श्रीनिवास सोनवणे यांनी केले या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य डॉ प्रियदर्शनी पवार, सुनील वानखेडे,सागर घायवट प्र.शा.तंत्रज्ञ गट प्रवर्तक सविता सुरडकर आशा सेविका, अंगणवाडी सेविका व इतर सर्वनी सहकार्य केले.
गोकुलसिंग राजपूत तालुका अध्यक्ष सोयगाव
0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *