औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जाफराबाद वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) व संजीवनी सक्षमीकरण आणि विकास संस्था औरंगाबाद यांच्या विद्यमाने फार्म प्रिसाईज ऍप च्या माध्यामातून खरीप हंगाम २०२२ मध्ये किड व रोग फोटो स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जाफ्राबाद येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमास वॉटर संस्थेचे विध्याधर कोंडे,सचिन आडे,गणपत कबाडी,अनिकेत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमामध्ये स्पर्धेतील विजेत्यांस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फोरस्ट्रोक पेट्रोल इंजिन स्प्रे पंप २० लिटर क्षमता,भागीनाथ बाबासाहेब आसने ब्राम्हणगाव ता.कोपरगाव जि.नगर,दुतीय पारितोषिक चार्जिंग स्प्रे पंप १५ लिटर क्षमता ज्ञानेश्वर बापूराव आदबाने चिंचोली,ता.भोकरदन,तृतीय पारितोषिक चार्जिंग स्प्रे पंप १५ लिटर क्षमता, गोपाल गजानन जाधव बोरी खुर्द,महादू विष्णू काकडे सोनखेडा ता.जाफ्राबाद यांना आणि उत्तेजनार्थ १० विजेत्यांस शेती उपयोगी ताडपत्री साईज १८*२४ पारितोषक वितरीत करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करतांना विध्याधर कोंडे यांनी फार्म प्रिसाईज ऍप ची ठळक वैशिट्य जसे कि हवामानाचा अंदाज,कृषी सवांद,किड व रोग व्यवस्थापन,खताचे कँलक्यूलेटर,फार्म डायरी,बाजार भाव आणि पिक निहाय शेतीविषयक सल्ला इत्यादी माहिती निशुल्क मिळते त्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी ऍप चा वापर करून शेतीचे तंत्रसुद्ध व्यवस्थापन करावे तसेच किड व रोग फोटो स्पर्धेची संकल्पना सांगताना विध्याधर कोंडे म्हणाले कि पिकावर पडणा-या रोगांची आणि किडींची ओळख शेतक-यांना व्हावी आणि शेतक-यांनी पिकाचे नियमित निरीक्षणे करून किडीचा जीवनक्रम,पिकाला होणा-या रोगांची लागण कश्या प्रकारे होते हे समजून घेता येईल.यासाठी या फोटो स्पर्धे मध्ये शेतक-यांनी भाग घेऊन किड आणि रोगांचे फोटो घेतल्या मुळे त्या शेतक-यांना पिकावर येणा-या किड व रोगांची त्याच बरोबर आपल्या पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यावरील उपाय योजना त्यांच्या लक्षात येईल.या स्पर्धे दरम्यान कृषी सवांदाच्या माध्यमातून वॉटर संस्थेच्या कृषी तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी शेतक-यांना कृषी संवादाच्या माध्यमातून मिळाले.यावेळी स्पर्धेतील विजेत्यांनी आपली मनोगत मांडली ते उपस्थित शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरले. त्याच बरोबर आणखी पुढे बोलताना विध्याधर कोंडेनी चालू रब्बी हंगामा मध्ये स्पर्धेचे बदलते स्वरूप आणि संकल्पना सांगून किड व रोग फोटो स्पर्धेचे आयोजन करणार आहोत यासाठी जास्तीत जास्त शेक-यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केले तसेच मागील स्पर्धेच्या विजेत्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी या कार्यक्रमास फार्म प्रिसाईज ऍपचा वापर करणारे शेतकरी आणि वॉटर संस्थेचे किशोर सोनुने,रविंद्र सहाने,सतीश कदम,रुपेश नागनाथवार,सतीश कदम,संदीप पंडित,गजानन हिवाळे,संजय खरात,रामेश्वर अंभोरे,किसन फदाट व पुरुषोत्तम गवळी यांची उपस्थिती होती.
Users Today : 5