महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न..

Khozmaster
2 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे लिंक वर्कर प्रकल्प व जागतिक एड्स दिनानिमित्त मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व ग्रामीण रुग्णालय अजिंठा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात एड्स जनजागृती, पोस्टर प्रदर्शन,चाचणी परीक्षा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक भोंबे एस.व्ही., ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक नितीन गजबे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण चव्हाण, लिंक वर्कर प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले,प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती अन्नपूर्णा ढोरे, सुपरवायझर उमेश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.कार्यक्रमात नितीन गजबे,अरुण चव्हाण व मुख्याध्यापक भोंबे यांनी विद्यार्थ्यांना एड्स या आजाराची कारणे, लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपाय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्स हा आजार झालेल्या व्यक्तींना समाजामध्ये सापत्न वागणूक न देता त्यांना सन्मानाने जगण्यासाठी व औषधोपचारासाठी मदत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अरुण चव्हाण देशमुख लिंक वर्कर  यांनी केले.श्री नितीन गजबे यांनी पोस्टर प्रदर्शन द्वारे एचआयव्ही, एड्स आजाराची कारणे व घ्यावयाची काळजी याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठीअजिंठा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज डोंगळकर,डॉ.किरण शेळके,इकबाल कासम तडवी बागुल जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग औरंगाबाद  वैद्यकीय परिचारिका श्रीमती माया ढगे, नितीन खडके,इम्रान शेख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मोनाली सोनवणे, पियुष तशीवाल,रामनाथ बडसल सुरेश  गव्हाणे यांसह विद्यालयाचे प्रा.के.एस.घोंगडे,प्रा.ए.के.बुलबुले, प्रा.डॉ.गोपीनाथ डापके,प्रा.कळम पी. आर.,प्रा.किरण मोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.एकनाथ जंजाळ यांनी केले.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *