विसरवाडी पोलीस ठाण्याचे मयत पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावित यांना : नंदुरबार जिल्हा पोलीस दलकडून भावपूर्ण श्रद्धांजली….

Khozmaster
2 Min Read
 प्रविण चव्हाण नंदुरबार
 नंदुरबार  जिल्हा प्रमुख  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे नेहमी सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात. जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व अंमलदारास आपल्या साहेबान बद्दल  नेहमी सतत आदर व अभिमान वाटतो, असे ते  नेहमी आवर्जून सांगतात .
     नंदुरबार जिल्हा पोलीस  दल मधील  प्रत्येक कनिष्ठ   सहकार्यास वाढदिवसाच्या दिवशी   जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षक हे न चुकता आपल्या पोलीस सहकाऱ्यांना  मोबाईल फोन वरुन अथवा साध्या फोन वरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नंदुरबार जिल्ह्यातील जर कोणी पोलीस कर्मचारी आजारी पडला असेल तर त्याला  स्वतः  भेटायला पोलीस अधीक्षक हे नेहमी आवर्जून जात असतात.  जर एखादा पोलीस खुपच आजारी असेल तर त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी एक  किंवा दोन महिण्याचा  किराणा माल पोहचवीत असतात.कोणी  पोलीस कर्मचारी जर  ड्युटीवर सेवा करीत असताना मयत झाल्यास त्याच्या परिवारास  स्वइच्छेने 05 लाखांहून अधिक रक्कम जमा करून देण्यात येते.जिल्ह्यातील सर्व पोलीसांचे डोळे भरून आले अशी एक नुकतीच घटना घडली . विसरवाडी पोलीस ठाण्याचे  पोलीस हवालदार विश्वास मोतिराम  गावित यांचे नुकतेच ब्रेन हॅमरेज या आजारामुळे निधन झाले. ड्युटीवर सेवा करीत असताना.30 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे परिषद पार पडली . परिषदेच्या सुरुवातीलाच पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जागेवर दोन मिनिट स्तब्ध उभे राहण्याचा सूचना करीत  मयत झालेले.आपले सहकारी हवालदार विश्वास मोतिराम  गावित यांना आपल्या संपूर्ण जिल्हा पोलीस दलाकडून  भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.एका कनिष्ठाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने भर गुन्हे सभेत दाखवलेली ही माणुसकीची भावना विरळच .
  पोलिसाबद्दल आपुलकी दाखविणाऱ्या या साहेबानची व त्याच्या या कृतीची सध्या पोलीस दलात चर्चा आहे .
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *