प्रविण चव्हाण नंदुरबार
गांजाची अवैध विक्री करणाऱ्याविरुध्द धडगांव पोलीसांची कारवाई , 1 लाख 52 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त.
अधिक माहिती अशी की,
जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून पोलीस अधीक्षक हे खूप संवेदनशील असून गांजा , अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक , लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते .
त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक , विक्री व लागवड यांचेवर कारवाई करणे साठी. त्याबाबतची माहिती घेत होते . दिनांक 02 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील खामला गावी परशा पटले हा त्याच्या घरात बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करीत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय .एन.पठाण व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले .धडगांव पोलीस निरीक्षक आय . एन . पठाण व त्यांचे अमंलदारांनी 5 ते 6 कि.मी. पायपीट करुन त्याचा पूर्ण पत्ता व घर शोधून त्याच्या घराच्या आजूबाजूला सापळा रचला . पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयीताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पर असलेल्या धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव पारशा कोंड्या पराडके रा . खामला ता . धडगांव जि . नंदुरबार असे सांगितले.धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाने पारशा पराडके याच्या घराची पाहणी केली असता 07 प्लास्टीकच्या कॅरेट मध्ये 1 लाख 52 हजार 145 रुपये किमतीचा 14 किलो 490 ग्रॅम हिरवट रंगाचे गांजा मिळुन आल्याने गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन पारशा कोंड्या पराडके( वय -37) व मुद्देमाल ताब्यात घेतला .तसेच आरोपी पारशा कोंड्या पराडके (वय -37) याचेविरुद् धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 339/2022 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 ( क ) , 20 ( ब ) , ( ii ) , ( ब ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सदरची कारवाई जिल्ह्या प्रमुख पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आय . एन . पठाण , तसेज पोलीस हवालदार जयेश गावीत , राजेंद्र जाधव , स्वप्निल गोसावी पोलीस नाईक शशिकांत वसईकर पोलीस अंमलदार रितेश बेलेकर , गणेश मराठे , विकास चौधरी , विनोद पाटील , जितेंद्र सांगळे , राजेश्वर भुसलवाड , राजेश तिरकाडे यांचे पथकाने केली असुन.पोलीस अधीक्षक , पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , तंबाखूजन्य व अमंली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात . तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक , सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो . तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले .
( पी . आर . पाटील भा.पो.से. )
पोलीस अधीक्षक , नंदुरबार
Users Today : 18