प्रतिनिधी प्रविण चव्हाण
समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिन (26 नोव्हेंबर) ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर) या कालावधीत समता पर्व साजरे करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे‘.समता पर्वाच्या निमित्ताने अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे शनिवार 3 डिसेंबर,1011 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, तृतीयपंथीय यांच्यासाठी कार्यशाळा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप व बक्षिस वितरणांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सोमवार 5 डिसेंबर,2022 रोजी अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे सकाळी 11 वाजता ‘संविधान जागर’ या विषयावर नंदुरबारचे विधी महाविद्यालयाचे डॉ.एन.डी.चौधरी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंगळवार 6 डिसेंबर,2022 रोजी सकाळी 9 वाजता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, साक्री रोड, नंदुरबार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता पर्वानिमित्त आयोजत कार्यक्रमासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ही. नादगांवकर यांनी केले आहे.
Users Today : 29