ग्रामसभेतच सरपंचपती यांची उमेश सरोदे या ग्रामस्थाला आई बहिणी वरून शिवीगाळ करत केली धक्काबुक्की

KHOZ MASTER
2 Min Read
 फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सोयगांव तालुका गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील जामठी येथे मंगळवार रोजी तक्रारदार सोयगांव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत जामठी या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्या ग्रामसभेत गावातील एक बौद्ध समाजातील  नागरिक उमेश हरी सरोदे वय 44 वर्ष  हे  ग्रामसभेत गेले होते त्यावेळी त्यांनी ‌ग्रामसेवक संदीप सावंत व‌ उपसरपंच हरीदास जाधव  यांना सामान्य नागरिक म्हणून विचारले की,  मागच्या वेळेस जो दलित वस्तीत पाण्याचा होता  त्याचा जो निधी आला होता त्याचे तुम्ही काय केले? असे विचारत असताना त्यांनी मला सांगितले की, तो दलित वस्तीचा पाण्याचा हौद बांधून झाला आहे.असे उत्तर‌ दिले.तेव्हा त्या उत्तराने तक्रारदार यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा उपसरपंच व ग्रामसेवक यांना विचारले की, हौद  कुठे बांधला? बांधला असेल तर तुम्ही दलित वस्तीतील लोकांना विश्वासात घेऊन तो पाण्याचा हौद बांधला का? असे तक्रारदार विचारत असताना व सविस्तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत असताना सरपंच पती  विलास दरबार राठोड हा तेथे आला व तक्रारदार याला  म्हणाला की “मादरचोद तू मला सांगतो का? पाण्याचा हौद कुठे बांधावा,अशी दमदाटी करुन मला शिवीगाळ केली व लोटलाट करून धक्काबुक्की केली व चापट बुक्क्यांनी मारहाण केली. असेही तक्रारदार याचे म्हणणे आहे त्या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्या शारदाबाई विनोद इंगळे यांनी भांडण सोडवा सोडवा  म्हणत होत्या तर त्यांना सुद्धा आडदांड सरपंच पती विलास राठोड व त्याची आई लाछाबाई दरबार राठोड यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली व लोटलात केली.यामुळे ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाला या सरपंच पती व त्याची यांच्या विरोधात फर्दापुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली असून सरपंच पती विलास राठोड व त्याची आई यांच्या विरोधात तक्रारदार उमेश हरी सरोदे यांच्या ‌तक्रारीनुसार भादवी कलम 324,504,34 अन्वये नोंद केला असून पुढील तपास कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे हे करित आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *