औरळा तालुका कन्नड येथील तरुणाचा खुन करुन पेडकवाडी घाटातील पाईप मध्ये पुरावा नष्ट करण्याचे उद्येशाने प्रेत टाकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Khozmaster
4 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा येथे दिनांक फिर्यादी नामे विनोद धनुलाल जैस्वाल वय ३८ वर्ष, व्यवसाय हॉटेल चालक रा. औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे फिर्याद दिली की, त्यांचा पुतण्या सागर संतोष जैस्वाल वय २१ वर्ष रा. औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद हा दिनांक २०/११/२०२२ रोजी घरी न आल्याने त्याबाबत पोलीस ठाणे देवगांव रंगारी येथे दिनांक २१/११/२०२२ रोजी तो बेपत्ता असल्याबाबत मिसींग दाखल करण्यांत आली होती. आम्ही त्याचा शोध घेत असतांना आम्हांला दिनांक ०१/१२/२०२२ दुपारी दोन वाजेच्या सुमारास पेडकवाडी येथील पोलीस पाटील आसाराम शंकर कलाल यांचेकडून माहिती मिळाली की, पेडकवाडी शिवारातील पेडकवाडी ते कोळवाडी जाणारे रोडवरील पेडकवाडी घाटात म्हसोबा देवस्थानाजवळील पुलाच्या पाईपमध्ये एक पुरुष जातीचे प्रेत साडी व प्लास्टीकच्या कव्हरमध्ये गुंडाळून टाकलेले आहे, अशी माहिती मिळाल्याने आम्ही तेथे जाऊन खात्री केली असता सदरचे प्रेत हे माझा पुतण्या सागर संतोष जैस्वाल याचेच असल्याचे आढळून आले, कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत साड़ी व प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून घाटातील पाईपमध्ये लपवुन ठेवले आहे. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गुरनं २५१ / २०२२ कलम ३०२, २०१ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे…सदर गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा (१) पंढरीनाथ परसराम वाघचौरे रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद (२) काकासाहेब परसराम वाघचौरे रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद (३) दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके रा. कविटखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद यांनी पैशाच्या देण्या घेण्याच्या वादावरुन केलेला आहे, त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे (१) पंढरीनाथ परसराम वाघचारे वय २८ वर्ष रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद (२) काकासाहेब परसराम वाघचौरे वय ३४ वर्ष, रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद (३) दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके वय २२ वर्ष रा. कविटखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मयत सागर जैस्वाल याच्याकडून पंढरीनाथ वाघचौरे व दिनेश उर्फ पप्पु साळूंके यांनी हात उसने पैसे घेतलेले होते. मयत सागर जैस्वाल हा नेहमी त्यांच्याकडे चार चौघात उसनवार घेतलेल्या पैशांची मागणी करुन त्यांचा अपमान करीत होता. त्यामुळे त्यांनी सागर जैस्वाल यास पैसे घेण्यासाठी पेडकवाडी शिवारात बोलाविले व तेथे त्यांनी त्याचा लोखंडी हातोडी व दगडाने डोक्यात मारुन त्यास जिवे ठार मारुन त्याचे प्रेत पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये टाकून दिले व त्याचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठया व कानातील बाळी काढून घेतली अशी कबुली दिली. त्यानंतर नमुद आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण यांचे ताब्यात देण्यांत आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण हे करीत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, पोह/ १८९ नागझरे, संजय घुगे, पोना वाल्मीक निकम, गणेश गांगवे, नरेंद्र खंदारे, उमेश बकले पोकों योगेश तरमाळे, जिवन घोलप तसेच पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोउपनि सागरसिंग राजपुत, पोह कैलास करवंदे, बाबासाहेब धनुरे यांनी केली आहे.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *