दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन नंदुरबार येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न….

Khozmaster
2 Min Read

 

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार

केंद्र व राज्य पुरस्कृत दिव्यांग योजनांचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, मनुदेवी फाउन्डेशन, नंदुरबार संचलित दुधाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, माजी विभागीय समाज कल्याण अधिकारी जितेंद्र वळवी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्षा ज्योती चौधरी, समन्वयक राजेश चौधरी, ॲड. जयश्री वळवी आदी  उपस्थित होते.यावेळी मंत्री डॉ. विजय गावित म्हणाले, दिव्यांग समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत असून शासनामार्फत दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अद्यापही या योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात आहे हया योजना अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी जनजागृतीची मोहिम राबवावी. जी दिव्यांग लहानमुले बोलत नसतील अशा मुलांवर पालकांनी वेळीच दवाखान्यात जाऊन उपचार करावे, जेणे करुन त्यांच्यावर उपचार करुन ते बोलू शकतील. जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प आयोजित करावेत त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल.  दिव्यांग क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून शासनामार्फत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याने अशा पुरस्कारांचाही लाभ घ्यावा. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान मिळण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. जेणे करुन या संस्था चांगल्या चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करुन देवू शकतील. दिव्यांग नागरिकांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ  देण्यासाठी आज पासून स्वतंत्र दिव्याग कल्याण विभाग  स्‍थापन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी ज्या दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्ड काढले नाही, अशा दिव्यांगांनी युडीआयडी कार्ड काढण्याचे आवाहनही केले.

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *