नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून अवैध दारुचा साठा करणाऱ्यावर धडक कारवाई, 42 लाख रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु जप्त.

Khozmaster
4 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून अवैध दारुचा साठा करणाऱ्यावर धडक कारवाई,
          अधिक माहिती अशी कि,
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक.डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे व अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते.
   त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांनी त्याबाबतचे आदेश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते.
        04 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोपर्ली गावातील इलेक्ट्रीक सबस्टेशन च्या पुढे मोठी भिलाटीत एक पत्र्याचे दरवाजा असलेले व हाफ लोखंडी शटर असलेले बंद घरात बेकायदेशीर अवैध देशी विदेशी दारुचा साठा करुन ठेवलेला आहे.
       त्या अनुषंगाने त्यांनी सदर माहिती अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना कळविली व त्यांनी स्वत: सोबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन तात्काळ कारवाई करणे बाबत आदेशीत केले.
         तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे यांचे नेतृत्वाखाली कोपर्ली गावात जावून कोपर्ली गावातील इलेक्ट्रीक सबस्टेशनच्या पुढे मोठी भिलाटीत एक पत्र्याचे दरवाजा असलेले व हाफ लोखंडी शटर असलेले बंद दिसल्याने घर मालकाला बोलावून.
  प्रल्हाद मधु पवार (वय-29) रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार. त्याच्या घराचे कुलुप उघडून पाहिले असता घरात खाकी रंगाचे खोके आढळून आले.
     खालील प्रमाणे दारु आढळून आली.
  
9 लाख 60 हजार रुपये किमंतीचे Classic व्हिस्कीचे एकुण 200 खोके, एका खोक्यामध्ये 180 एम.एल. चे 48 बाटल्या अशा एकुण 9600 बाटल्या.
19 लाख 20 हजार रुपये किमंतीचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण 400 खोके, एका खोक्या मध्ये 180 एम.एल. चे 48 बाटल्या अशा एकुण 19,200 बाटल्या.
13 लाख 20 हजार रुपये किमंतीचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण 200 खोके, एका खोक्यामध्ये 750 एम.एल. चे 12 बाटल्या अशा एकुण 2400 बाटल्या.
    असा एकुण 42 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल,
प्रल्हाद मधु पवार. याच्या घरात मिळून आल्याने त्यास सदर ची विदेशी दारु कोठून आणली ? याबाबत विचारले असता त्याने सदरची विदेशी दारु सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता.शहादा जि. नंदुरबार याची असले बाबत सांगितल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे .
 प्रल्हाद मधु पवार (वय-29 ) रा. कोपर्ली ता.जि. नंदुरबार.
 सतु भिल ऊर्फ सत्तार ठाकरे रा. म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार यांचेविरुध्द् नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
         सदर ची कारवाई.
   पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे,  उप विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,  यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  राहुलकुमार पवार, पोलीस उप निरीक्षक  कमलाकर चौधरी, पोलीस नाईक राजु गावीत, साहेबराव जाधव, राजेंद्र धनगर, चुनिलाल वसावे, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, करणसिंग वळवी, महिला पोलीस अंमलदार गीता लोहार यांच्या पथकाने केली आहे.
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *