श्रीराम नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन.
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नगरपरिषदेच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून तळोदा रस्त्यावरील हनुमंत पेट्रोल पंप समोरील डीपी रस्त्यापासून ते श्रीराम नगर पर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.पाईपलाईन टाकल्यामुळे श्रीराम नगर,नमस्कार कॉलनी व एम.के नगरातील साधारणता ५ ते ६ हजार रहिवाशांना पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
रविवार दि.४ डिसेंबर रोजी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पाईपलाईन टाकण्याच्या कमाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाला वसावे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक परवेज खान,नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक जगन्नाथ माळी,माजी नगरसेवक शत्रुघ्न बालाणी,फारुख मेमन,चेतन वळवी,अतुल पाटील यांच्यासह श्रीराम नगर,नमस्कार कॉलनी,एम.के नगर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या माध्यमातून १५ व्या वित्त आयोगातून अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत. नंदुरबार शहरातील श्रीराम नगर, नमस्कार कॉलनी,सेवकराम नगर व एम.के नगरात कमी दाबाच्या पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा.रत्ना रघुवंशी यांनी उपाययोजनेच्या सूचना दिल्या.
त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यात विषय समावेश करण्यात आला.
सभेत विषयाला मंजुरी देण्यात आली होती.
उच्च दाबाच्या पाणीपुरवठा; रहिवाशांमध्ये समाधान
नंदुरबार शहरातील श्रीराम नगर, नमस्कार कॉलनी,सेवकराम नगर व एम.के नगरात तांत्रिक अडचणीमुळे यापूर्वी कमी दाबाच्या पाणीपुरवठा होत होता. परंतु, आता तळोदा रस्त्यावरील हनुमंत पेट्रोल पंपाच्या डीपी रोड पासून ते श्रीराम नगर पर्यंत २ किलोमीटर पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याने उच्च दाबाच्या पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे रहिवाशांच्या पाण्याच्या प्रश्न सुटणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 26