एल.आर.टी.च्या एन.सी.सी. युनिट तर्फे पुनीत सागर अभियाना अंतर्गत स्वच्छ केले मोर्णा नदीचे पात्र

Khozmaster
2 Min Read
एल.आर.टी.च्या एन.सी.सी. युनिट तर्फे पुनीत सागर अभियाना अंतर्गत स्वच्छ केले मोर्णा नदीचे पात्र….
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय अकोला च्या एन. सी. सी. युनिट तर्फे पुनीत सागर अभियानांतर्गत स्वच्छता अभियान मोहीम राबविली. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी तसेच एल. आर. टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांच्या मार्गर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर व हवालदार आशिष आठवले यांच्या उपस्थिती मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र एन. सी. सी. संचालनालय यांच्या वतीने भारत सरकारच्या राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त दि. २ ते ९ डिसेंबर २०२२ दरम्यान ‘पुनीत सागर अभियान आयोजीत केले आहे. अकोला शहरातील मोर्णा नदीची स्वच्छता आज या मोहीमे अंतर्गत एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोल्याच्या एन. सी. सी. युनिट तर्फे आज दि. ०५ डिसेंबर, २०२२ रोजी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ६० छात्र सैनिकांनी स्वच्छता केली. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) यांनी २२सप्टेंबर, २०२३ रोजी नवी दिल्ली येथे रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत प्लॅस्टिक प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी आणि सार्वभौमत्व साध्य करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ‘पुनीत सागर अभियान’ हा एक उदात्त उपक्रम असून १.५ दशलक्ष एन. सी. सी. कॅडेट् जगभरातील तरुणांच्या विचारसरणीवर प्रभाव टाकत असून या मोहिमेसाठी जन आंदोलन उभारीत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट शिवम देशमुख,
कॅडेट ओम हिरनवाड़े, कॅडेट सूरज सरकटे, कॅडेट सूरज मुरुमकर, कॅडेट ऋषिकेश शेलार, कॅडेट ऋतिक आगरकर, कॅडेट श्रीकांत वाढोकर, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट सर्वेश ढांडे, कॅडेट नयन घुगे, कॅडेट स्वराज बोदडे, कॅडेट यश कमलाकर, कॅडेट विशाल गवईआणि इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *