धोंडिरामसिंह राजपूत यांचा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केला सत्कार

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर येथील मराठवाड्याचे बाल साहित्यिक व लेखक तथा माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांना सेवा निवृत्त होऊन जवळ पास पंधरा वर्षाचा काळ लोटत आहे ७३ वर्षात पदार्पण करीत असताना त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक  २०२२च्या निवडणूकिचे कामाचा तहसीलदार यांचा आदेश स्वीकारून मतदान अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया समजाऊन सांगणे, ई, व्ही, एम,कार्य व सर्व प्रकारचे मतदान प्रक्रियेशी संबंधित प्रशिक्षण दिले ,त्यांच्या सेवेबद्धल वैजापूर चे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या,याप्रसंगी नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर,शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर,श्री पुंड,श्री दुशिंग,सचिन गायकवाड,श्री वाघ यांच्या सहं मतदान केंद्राध्यक्ष ,व अधिकारी उपस्थित होते(फोटो  कॅप्शन-तहसीलदार राहुल गायकवाड यांचा सत्कार
करतांना, शेजारी नायब तहसीलदार किरण कुलकर्णी)
0 9 4 7 6 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *