जागतिक दिव्यांग दिनी वैजापुरात जाणीव -जागृती फेरी

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ‌”दिव्यांग व्यक्ती कुणाची–तुमची आमची सर्वांची”,मिळू न सारे ग्वाही देऊ,दिव्यांगांना सक्षम बनवू, “दिव्यांगांचा मान -देशाचा अभिमान “,अशा घोषणा देत येथील पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  शनिवार(ता०३) रोजी दिव्यांग जागृती फेरी काढून समाजातील  नागरिकांना दिव्यांग विषयी
सहानुभूती दाखविण्याचे आवाहन केले,शहराच्या विविध भागातून जाणाऱ्या या फेरीला माजी शिक्षणाधिकारी व स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत,
गट  शिक्षणाधिकारी हेमंत उशीर,बाबासाहेब जगताप
 शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी झेंडा दाखविला, समग्र शिक्षण जि,प,औरंगाबाद, समावेशीत शिक्षण गट साधन केंद्र,शिक्षण विभाग प,स,बैजापूर, व मौलाना आझाद विद्यालय न,प,वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनी ही जाणीव जागृती फेरी काढण्यात आली,या समयी,मुख्याध्यापक जी, जी, राजपुत
,बी,बी,जाधव,एम,आर, गणवीर,संदीप,शेळके, नीता पाटील,सुवर्णा बोर्डे, लता सुखासे,राजश्री बंड, सुनीता वसावे,श्री रावकर, यांनी फेरी आयोजन केले होते,शेवटी  आयोजक बाबासाहेब जगताप यांनी आभार मानले,(फोटो  कॅप्शन-हिरवी झेंडी दाखविताना धोंडीराम राजपूत, हेमंत उशीर,जी, जी ,रजपूत, श्री जाधव
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *