जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रगती व विकासासाठी आम्ही कटिबद्ध- मा.आ.हरीषभाऊ मा.पिंपळे
अकोला (भुषण महाजन)- जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे अभ्यगत समिती अध्यक्ष माननीय आमदार श्री हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच अभ्यागत समिती सदस्यांच्या उपस्थिती मध्ये अभ्यगत समितीची प्रथम बैठक संपन्न झाली. तसेच यावेळी जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत NICU ची पाहणी करण्यात आली. तसेच रुग्णालय विकास कामा बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये, 1. जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे पोलीस चौकी मिळण्याबाबत. 2. भारतिया धर्मशाळा विस्तारीकरण करण्याबाबत. 3. नविन सुलभ शौचालय ( जुन्या शौचालयाचे नुतनिकरण व विस्तारीकरण ) 4. परिचारीका प्रशिक्षण केंद्र येथे २०० मुलींसाठी वस्तीगृह व प्रशिक्षण इमारत बांधणे. 5. एम.एन.सी.यु. कक्षाचे विस्तारीकरण करणे. 6. कार्यालया करीता संगणक संचाची मागणी करणे 7. लोकवर्गणी साठी आव्हान – रुग्णांसाठी रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यास्तव करणे. 8. नविन पाण्याच्या टाकीजवळ गार्डन बनविण्याकरीता महाबिज यांचे कडे मागणी करणे. 9. रुग्णालयात रुग्णांसाठी सोलर हिटर ची मागणी करणे. 10. महानगरपालीका अकोला यांचे कडुन रुग्णालयास होणाऱ्या पाणीपुरवठा बाबत. 11. रुग्णालयाकरीता भरतीया धर्मशाळे समोरील चौधरी हायस्कुल पर्यंतचा मुख्य रस्ताचे काम होणेबाबत. सदर विषयांवर यावेळी सभेमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी अभ्यागत समिती अध्यक्ष मा.आ. श्री हरीषभाऊ मा. पिंपळे, मा.आ. रणधीरभाऊ सावरकर, डॉ.आरती कुलवाल वैद्यकीय अधीक्षिका तथा सचिव जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला, अभ्यागत समिती सदस्य श्रीमती चंदाताई शर्मा, श्री मनिरामजी टाले, श्रीमती चंदाताई लाहोळे, श्री अक्षय जोशी तसेच इतर मान्यवर, डॉक्टर स्टाफ, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Users Today : 0