मूर्तिजापूर (भुषण महाजन) – मुर्तिजापुर येथे शनिवार दि. 3 डिसेंबर 2022 रोजी संत शिरोमणी रविदास महाराजांची पुण्यतिथी मूर्तिजापूर येथील आशिर्वाद व-हाडी चव या हॉटेलवर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री सुरेशराव तायडे होते.त्यांच्या शुभहस्ते प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले व उपस्थित सर्व समाज बांधवांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री रमेशराव इंगळे यांनी केले. प्रसंगी सर्वश्री रणजीत इंगोले, विष्णू ढाकरे, शंकराव नाचणे, प्रकाश नाचणे, संजय नाचणे, प्रभाकर आंबीलकर, दामोदर खंडारे, प्रवीण धामणे, रमेशराव वानखडे, श्यामभाऊ खंडारे, दिलीप चंदन, काशिनाथ इंगळे आदी समाज बांधव उपस्थित होते. तसेच आभार प्रदर्शन हॉटेलचे संचालक दिवाकर सोनोने यांनी मानले.
Users Today : 0