स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर
तालुक्यातील 51 ग्रामपंचायतच्या सर्वाधिक निवडणूक अंतर्गत सरपंचाचे 51 पदांसाठी 213 तर सदस्यांसाठी 391 पदांसाठी 720 अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कडे दाखल करण्यात आले सादर अर्जाची छाननी आज सोमवार पाच डिसेंबर रोजी करण्यात आली छाननी मध्ये उमेदवारी अर्ज वैद्य ठरल्यानंतर बुधवार पर्यंत उमेदवार निवडणुकीत माघार घेऊ शकतात तब्बल 51 ग्रामपंचायत साठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर वीस डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे सादर ग्रामपंचायत साठी 28 नोव्हेंबर पासून प्रत्येक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरुवात झाली या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार वर मतदारांमध्ये कमालीचा उत्सव दिसून येते आहे गावागावात पुढाऱ्यांचे प्लॅन उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येत आहे दरम्यान सरपंच व सदस्य पदासाठी एकूण 933 अर्ज प्राप्त झाल्याने इच्छुकांची भाऊ गर्दी अधिक झाल्याची दिसून येत आहे.
Users Today : 51