आईच्या जलदान विधीचा खर्च वृध्दाश्रमास दिला दान

Khozmaster
1 Min Read

आईच्या जलदान विधीचा खर्च वृध्दाश्रमास दिला दान
चिखली भोकर येथील कर्तव्यक्षनिष्ठ सेवानिवृत्त प्राचार्य विजय कचरुजी डोंगरदिवे यांनी आईच्या जलदानविधीचा खर्च रुपये पाच हजार तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे दान दिले.
आदर्श विदयालय चिखली चे सेवानिवृत्त प्राचार्य विजय कचरुजी डोंगरदिवे यांच्या आई कुशीवर्ता कचरुजी डोंगरदिवे यांना वृध्दापकाळाने दुखद निधन झाले. त्यांच्या जलदान म्हणजेच दुख सावरण्याच्या कार्यक्रमासाठी होणारा अनाठाई खर्च टाळत गोरगरीब निराधार वयोवृध्दांची निरंतर सेवा करणारे तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे आई कुशीवर्ता कचरुजी डोंगरदिवे यांच्या स्मरणार्थ रुपये पाच हजार देऊन भोकर गावामधे एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.तसेच त्यांच्या दानवृत्ती स्वभावाची प्रचीती सर्वश्रुत आहेच. यावेळी प्राचार्य विजय डोंगरदिवे, गजानन डोंगरदिवे, सौ पुष्पाताई इंगळे, सौ. वंदना गवई, सौ.कावेरी जोगदंड, सौ रत्ना डोंगरदिवे, सौ वर्षा डोंगरदिवे, राहुल गवई यांनि आपल्या आईच्या जलदान विधीचा खर्च रुपये पाच हजार तुकाराम आश्रय वृध्दाश्रम चे व्यस्थापक प्रशांतभैया डोंगरदिवे सौ रुपालीताई डोंगरदिवे यांच्या सुपुर्त केला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असुन वृध्दाश्रमाच्यावतीने त्यांचे आभार मानले आहे.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *