रुईखेड येथील अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये दोन युवकांचे निवड झाल्याबद्दल अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी विशाल गवई

अकोट तालुक्यातील ग्राम रुईखेड येथे शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता समर्थ मंगल कार्यालयात अग्नी वीर इंडियन आर्मी जवानांचा भव्य सत्कार सोहळा अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री नितीन देशमुख यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच गावातील देश सेवेत कार्यरत असलेले राजेश वरठी अजय मालवे संदीप वाकोडे या जवानांचा पण सत्कार करण्यात आला अकोट तालुक्यामधून रुईखेड येथील दोन युवकांची अग्नीवीर इंडियन आर्मी मध्ये निवड झाली त्या अनुषंगाने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते व तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्य मूल्यांकनामध्ये जिल्ह्यातून सलग तीन दा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल ठाणेदार नितीन देशमुख यांचा सुद्धा या अनुषंगाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच आऊट पोस्ट पोलीस चौकी रुईखेड चे बीट जमादार गजानन भगत यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावातील नागरिक व महिला वर्ग व युवक उपस्थित होते उपस्थित युवकांना पोलीस भरती संदर्भात मार्गदर्शन केले व गावातील नागरिकांना ठाणेदार साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे रुईखेड नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व सर्व स्तरातून सर्व पोलीस प्रशासनाचे व तसेच दोन्ही युवकांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे विशाल सुनील इंगळे व सुदर्शन शहादेवराव डाबेराव दोन्ही युवकांनी कुठली सुविधा नसतांनी सुविधांचा अभाव असतानाही स्वतःच्या बळावर हे अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये निवड झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष अनोख राहणे अकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष व तसेच मंचावर उपस्थित सुधीर मेतकर ह भ प विलास महाराज झापे उपस्थित होते तसेच ठाणेदार नितीन देशमुख यांचा सत्कार श्री गोपाल ठोसर यांनी केला व अध्यक्षांचा सत्कार निलेश कोकाटे यांनी केला प्रास्ताविक आशिष झापे यांनी केले व आभार प्रदर्शन मंगेश निंबोळकार पत्रकार यांनी केले गावकऱ्यांचे उपस्थितीत मोठ्या थाटात सत्कार समारंभ संपन्न झाला तसेच कार्यक्रमात रुईखेड येथील सर्व गावातील नागरिकांनी मोलाची कामगिरी केली तरुनांचा उत्साह व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन गावकरी आनंदात दिसत होते कार्यक्रमात मित्र परीवार व गावकरी मंडळी व समर्थ मंगल कार्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळींनी केले.

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *