राहुल मधुकर मघाडे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनीधी रवि मगर बुलढाणा
 जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोलारा येथील श्री राहुल मधुकर मघाडे हे प.पू.राष्ट्रसंत भैय्युजी महाराज प्रणित सूर्योदय आदिवासी आश्रम शाळा खामगांव येथे शिक्षक असून त्यांना नुकताच श्रीरामपूर येथे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.वर्ल्ड  काॅन्स्टीट्यूशन पार्लमेंट अ‍ॅन्ड  असोसिएशन्सचे अध्यक्ष डॉक्टर ग्लेन टी मार्टिन (अमेरिका)यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह याचे वितरण करण्यात आले.त्यांचे पारध्याचं पाल,या झोपडीत माझ्या, प्रेतावरल्या भोंग्याच जिणं,अमान्य कटुसत्य, जीवन एक संघर्ष, टीचभर पोटासाठी,युगपुरुष- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,असे अनेक नानाविध प्रकारचे लेख व सामाजिक विषयावरील कविता वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आहे.राहुल मघाडे यांच्या सत्कारामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *