शिवाजी विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन

Khozmaster
2 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शिवाजी विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व ज्ञानाचा अथांग महासागर आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जय कालिंका देवी शिक्षण संस्था संच सावळदबारा येथे संस्थेचे अध्यक्ष श्री भावराव कोलते व सचिव श्रीमती रत्नाबाई कोलते व संचालक मंडळ   यांच्या उपस्थितीत शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री कोलते एन आर   व प्रा प्रा थोटे वाय वाय व शेळके पीवी यांच्या हस्ते व  मेणबत्ती लावून महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळेस प्राचार्य कोलते सर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून कशाप्रकारे शिक्षणाशिवाय कोणाची प्रगती नाही त्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन मनपूर्वक अभ्यास केला पाहिजे व व जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन केले पाहिजे त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडू शकते व माणसाचा कुटुंबाचा समाजाचा व साहजिकच देशाचा विकास हा यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करून जगामध्ये एक वेगळा आदर्श बाबासाहेबांनी निर्माण करून दिला त्यामुळे आजही सुवर्ण अक्षरांमध्ये त्यांचे नाव लिहिले तरी कमीच आहे अशा या महामानवाला अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी महामानवाला अभिवादन म्हणून आज शाळेच्या प्रांगणात राज्यघटनेचे वाचन करून व पुस्तकांचे वाचन करून खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन  केकेले याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रार्थना केली की आयुष्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असे वागणार नाही व प्रज्ञा शील करुणा हे तत्व जीवनात अंगीकृत करून शिका व संघटित व्हा  अशा गगनभेदी घोषणा दिल्या व महामानवाला  अभिवादन  करण्यात आले  व अभिवादन केले करण्यात आली संस्थेतील सर्व प्राध्यापक मोहने सर गावंडे सर चोपडे सर शिसोदे सर चव्हाण सर राठोड सर पडवळ सर शिक्षक विकास पाटील विजयसिंह राजपूत भास्कर ससाने विनोद जाधव संजय जोशी श्रीकृष्ण सोनवणे सुदाम राठोड मुकुंदा व्यवहारे भास्कर खमाठ पोपटराव सोनवणे ज्ञानेश्वर राठोड अजबराव चव्हाण श्याम जाधव व शिक्षकेतर बाबासाहेब कोलते राहुल बडक,संदीप कोलते गजानन चव्हाण विनोंद चव्हाण बंधू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली.
0 9 4 7 6 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *