महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..।

Khozmaster
1 Min Read

सतीश मवाळ मेहकर

मंगळवार रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे महामानव भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप  गवई बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय सरकटे,मेहकर तालुका अध्यक्ष सचिन गवई यांनी मेहकर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तथागत ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप  गवई यांनी आपले विचार मांडताना आपल्या भाषणात सांगितले की घायाळ पाखरांना पंख दिले तू ,मुक्या वेदनांना शब्द दिले तू,तुझ्या चेतनेने जगण्यास अर्थ आला,युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला शिका,संघटित व्हा व संघर्ष करा’ बहुजन समाजाच्या उद्धाराचं तत्त्वज्ञान मांडणारे समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान न्याय स्वातंत्र्य मतदनाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली त्याची जपणूक करूया महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले…

यावेळी  राष्ट्रीय अध्यक्ष.संदिप  गवई ,कुणाल माने,राजकुमार ऊचित, विजय सरकटे,सचिन गवई, राधेश्याम खरात,योगेश अवसरमोल,नितीन गवई,अनिल देबाजे,नागेश म्हस्के, गौतक्ष नरवाडे,संदिप राऊत, कैलास दुगाने,अख्तर कुरेशी,असलम गवळी,आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *