दिपक मापारी, रिसोड
रिसोड तालुक्यातील सवड येथील श्री. सिद्धेश्वर विद्यालय येथील २ मुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून त्यामध्ये कु सृष्टी दत्ता कापुरे वर्ग १० वा कु.शिवकन्या गोकुळ खांदळे वर्ग ९.वा ह्या २ मुलींनी सबज्युनिअर गटाची निवड चाचणी २७ नोव्हेंबरला कोंडाळा झांमरे येथे दिली असून त्यांनी आपल्या कबड्डी खेळाचे उत्कृष्ट कौशल्य दाखविल्यामुळे त्यांची वाशिम जिल्ह्याच्या सबज्युनिअर संघामध्ये निवड झाली असून हा संघ १० व ११ डिसेंबरला यवतमाळ या ठिकाणी संपन्न होणाऱ्या ३२.वी सबज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत या दोन्ही मुलीच्या कबड्डी कौशल्याचे कौतुक गावकऱ्यासह या परिसरात होत असून त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई-वडीलाना विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गाडे मुख्याध्यापक व्ही एस सावसुंदर यांना देऊन मार्गदर्शक क्रीडा शिक्षक पी.व्ही मोरे यांना दिले आहे..
Users Today : 25