प्रतिनिधी प्रविण चव्हाण
शहादा तालुक्यातील मनरद गावा जवळील पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात फॉरेन्सिक लॅब या विभागाची पोलीस व्हॅन पलटल्याने चालकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून दुचाकी वरील ७२ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना घडली आहे . पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे काल दि . 3 नोव्हेंबर रोजी रात्री चार ठिकाणी घरफोडी झाल्याने तेथील ठसे व महत्वाची माहिती संकलित करण्यासाठी आज नंदूरबार येथील फॉरेन्सिक लॅब चे पथक दाखल झाले होते . दरम्यान ५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लोणखेडा येथून माहिती संकलित करून पुन्हा नंदुरबार येथे जात असलेल्या फॉरेन्सिक लॅब या पोलीस विभागाच्या पोलीस व्हॅनचा मनरद ता.शहादा गावाजवळील नायरा पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल ( क्र . एम . एच . १८ ए.एफ ५७०० ) ला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस व्हॅन पलटून रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली . त्यात होंडा एक्टिवा चालविणारे शंकर त्र्यंबक पाटील ( ७२ ) रा . मनरद , ता . शहादा हे जागीच ठार झाले .तर या अपघातात पोलीस व्हॅन चालक साबीर फिरोज पिंजारी , प्रकाश नथू भाबड , संजय रतन रामोळे , दिनेश गोपाल लाडकर , गोकुळ भरत गावित , दिलीप संतोष गावित हे जखमी झाले आहेत . त्यात साबीर पिंजारी व प्रकाश नथू भाबड यांना जबर दुखापत झाल्याने दोघांची प्रकृती गंभीर आहे.या अपघाता बाबत रात्री उशिरा पर्यंत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
