प्रतिनिधी प्रविण चव्हाण
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या ७ डिसेंबर पासून दत्त जयंतीनिमित्ताने यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आढावा बैठक घेत यात्रेची पाहणी केली .श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली . पी . आर . पाटील यांनी घोडेबाजार , चेतक फेस्टिव्हल चे पटांगण , अश्व शर्यतीसाठी तयार झालेले रेसिंग ट्रॅक , टेंट सिटी तसेच यात्रा परिसराची पाहणी केली . कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाने खबरदारी बाळगत काम करावे . पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या . यात्रेत आलेल्या पर्यटकांना कसलीही गैरसीय होणार नाही याची काळजी घ्यावी.शक्य झाल्यास गावातील तरुण मुलांना स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून जोडून घ्याव्यात व यात्रा सुरळीत पडावी . यात्रेत कायदा सुव्यस्थेची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी . सारंगखेडा यात्रेत कुठलेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी . पोलीस प्रशासनाकडून ६ पोलीस निरीक्षक , ११ पोलीस उपनिरीक्षक , १५० पोलीस कॉन्स्टेबल , १५० गृहरक्षक यात्रेसाठी तैनात केले जातील . अशी माहिती पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी दिली.जयपालसिंह रावल यांनी चेतक महोत्सवामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली . यंदा होणाऱ्या चेतक एक्वाइन प्रीमियर लीग संदर्भात माहिती दिली . तसेच दोन दिवसात घोड्यांची आवक वाढेल व ३ हजाराहून अधिक घोडे दाखल होते अशी माहिती दिली . तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांनी आपली कामे चोख पार पाडावीत . कुठल्याही कामात दिरंगाई न करता शक्य होईल तेवढी मदत प्रशासनाने सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी . उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले व स्थानिकांच्या मदतीने येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या प्रयत्न करावा.चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , तहसीलदार मिलिंद कुलकर्णी , पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अंबालाल पाटील , उपाध्यक्ष रवींद्र पाटील , सचिव भिक्कन पाटील , ट्रस्टी रमेश पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे , जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक भरत जाधव , पोलीस निरीक्षक एस.एन. कोळी , पोलीस निरीक्षक योगेश कोळी , मंडळ अधिकारी जुबेर पठाण , तलाठी एस . एन . डिगराळे , वैद्यकीय अधिकारी डॉ . कांतीलाल पावरा , डॉ . किशोर पाटील , ग्रामपंचायत सदस्य , गावकरी व प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते .
Users Today : 2