प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसां सोबत होमगार्ड यांची जबाबदारी महत्त्वाची असते . पण होमगार्डच चोरी करू लागले तर ? तुम्ही कधी याचा विचार केलाय का ? मात्र , असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय.ज्यामध्ये होमगार्डच चोर निघाल्याचं पहायला मिळतंय.नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सुमित बिअर शॉपी मध्ये गल्ल्यातून १८ हजार रुपये लंपास केल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली . या अनुषंगाने बिअर शॉपिचे संचालक सुमित गावित यांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .
त्यानंतर नवापूर पोलीसांनी त्याचा शोध घेतला अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला नवापूर पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले . गुजरात राज्यात पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ , योगेश थोरात , गुमानसिंग पाडवी , दिनेश वसुले यांच्या पथकाने ससा गावात जाऊन शोध घेतला असता , तो पोलीसांना पाहून मोटरसायकलीवरून पळत असताना पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन नवापूर पोलीस ठाण्यात आणले . सुमित बियर शॉपीतून 18 हजार चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुजरात राज्यातील ससा या गावातील संशयित आरोपी ऐलिम ईश्वरभाई गामीत असल्याचे समोर आले आहे . सदर संशयित आरोपी गुजरात राज्यातील उच्छल पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती उच्छल पोलीस ठाण्यातील पीएसआय एन.जी.पांचाळ यांनी दिली . कुंपणच शेत खात असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवावा असा सवाल उपस्थित होत आहे .
Users Today : 18