चिखली व तोरणवाडयात कॉग्रेस कडुन डॉ.आंबेडकरांना अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थषास्त्रज्ञ राजकारणी आणी थोर समाजसुधारक होते, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणुनही त्यांना विष्वभरात ओळखल्या जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दिन,दलीत, मजुर, स्त्रिया यांच्यावरील सामाजीक भेदभावा विरूध्द आवाज उठवून विरूध्द संघर्ष करीत पिडीतांना न्याय देण्याचे अजरामर कार्य केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षत्यातुन पिडीत शोषीतांच्या जगण्याला बळ दिल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चिखली विधानसभा मतदार संघातील मौजे तोरणवाडा येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास गावक-यांसह विनम्र अभिवादन करण्यात आले. तर चिखली कॉग्रेस कमिटीच्या वतीने अषोक वाटीकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.06 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे षिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणुन देषभरात साजरा केला जातो. सन 1956 साली या दिवषी देषाची राजधानी दिल्ली येथील राहत्याघरी डॉ.भिमराव रामजी आंबेडकर याचं निधन झालं. त्यामुळे या दिवसाला महापरिनिर्वान दिन म्हणुन संबोधल्या जाते. चिखली मतदार संघातील मौजे तोरणवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी विष्णु पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, राम डहाके, मनोज लाहुडकर, सरपंच कविताताई गवई, संघपाल गवई, त.मु.अध्यक्ष गौतम गवई, माजी सरपंच समाधान शेळके, बाळु पाटील, गजानन गवई, श्रीकृष्ण गवई, शोभाबाई गवई, जयराम गवई, विक्रम गवई, नारायण गवई, यांच्यासह ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती.
चिखली कॉग्रेस कमिटीच्या वतीने येथील जयस्तंभ चौक अषोक वाटीकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, डॉ. मोहमंद इसार, कुणाल बोंद्रे, किषोर कदम, राजु रज्जाक, गोकुळ षिंगणे, दिपक थोरात, अॅड. प्रषांत देषमुख, रामधन मोरे खलील बागवान, जाकीर भाई, बबलु शेख, आनंता जाधव, लक्ष्मण भिसे, यांच्यासह असंख्य नागरीक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिीती होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत पिडीतांच्या जगण्याला बळ दिले – राहुलभाऊ बोंद्रे
0
9
4
6
8
7
Users Today : 37
Leave a comment