नंदुरबार जिल्ह्यातील शहादा  पोलीस स्टेशन येथील   सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरेंच्या कार्याला सलाम.

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
वीस फूट पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.
महाराष्ट्रात पाण्यात बुडून बरेच लोक आपले प्राण गमावतात करतात किंवा त्यावेळी  आत्महत्या पाण्यात बुडालेल्या मृतदेहाला शोधून बाहेर काढण्यासाठी गोताखोर अथवा पट्टीच्या पोहणार्यांची मदत घेतली जाते . सहसा पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी काढत नाहीत , असे आजपर्यंत आपण अनुभवले आहे . परंतु शहादा पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस सहाय्यक निरीक्षक राजन मोरे स्वतः १५ ते २० फूट खोल पाण्यात उतरून गोताखोराला सोबत घेऊन एका इसमाच्या मृतदेह बाहेर काढत आपले कर्तव्यप्रामाणिकपणे बजावले .
 पाण्यातून स्वतः मृतदेह बाहेर काढणारे सी . राजन मोरे हे कदाचित पहिलेच पोलीस अधिकारी असल्याने त्यांचे सोशल मीडिया वरुन अभिनंदन व कौतुक ही करण्यात येत आहे .
  अधिक माहिती अशी  की , शहादा पोलीस स्टेशन हदीतील असलोद दूरक्षेत्र अंतर्गत येणार्याजाम ( जवदा ) ता.शहादा येथील के.टी. बेअर  बंधाऱ्यात  दि . ३० नोव्हेंबरला मध्यप्रदेश राज्यातील लालसिंग शिवराम चव्हाण ( वय ३५ , रा . देवधर पानसेमल , जि.बडवाणी ) या व्यक्तीने उडी घेतली . दोन दिवसापासून  मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती . परंतु शर्तीचे प्रयत्न करूनही हाती काहीही मिळत नव्हते.त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी १५ ते २० फूट पाण्याची खोली होती.परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या सोबत प्रकाशा ( ता.शहादा ) येथील सीताराम पुंजू भोई यांना बोलावून त्यांच्यासोबत स्वतः  त्याठिकाणी सोबत घेऊन पाण्यात उतरून त्या व्यक्तीला बाहेर काढून आपले कर्तव्य बजावले . सर्व गावकर्यांनी त्यांचे अभिनंदन केले स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढणारे हे पहिलेच अधिकारी असतील , अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त करण्यात येत आहे.म्हणून जे अधिकारी मनापासून कर्तव्य पार पाडत असतात त्यांचे नेहमीच जनतेतून कौतुक होत असते व वरिष्ठ देखील या गोष्टीची दखल घेत असतात .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *