कुणबी समाज विकास मंडळाचा विभागीय वधु वर परिचय मेळावा संपन्न

Khozmaster
2 Min Read
युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात दिला प्रतिसाद
वधु वर परिचय मेळावा काळाची गरज मान्यवरांनी केले विचार व्यक्त
प्रतिनिधी योगेश नागोलकार‌ पातूर
तालुक्यात कुणबी समाज विकास मंडळाच्या वतीने दि. 3 डिसेंबर रोजी स्वर्गीय किसनराव सोनवणे मंगल भवन गोरक्षण रोड अकोला या ठिकाणी कुणबी समाजाचा वधू वर परिचय व पालक मेळावा नुकताच संपन्न झाला आहे.सदर मेळाव्या करता संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व स्तरातील 200 च्या वर उपवर मुला मुलींनी  आपली नोंदणी केली असून मंचावरून परिचय देऊन या मेळाव्याला युवक युवतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
तर पालकांनी सुद्धा हजारोच्या संख्येत येथे उपस्थिती देऊन वधु वर परिचय मेळावा हा काळाची गरज असल्याने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आहे
वधू-वर परिचय व मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश बोर्डे तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरेश मामा बोंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुलभाताई रमेश दुतोंडे जिल्हा परिषद सदस्य अकोला  विनोद भाऊ सोनवणे योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगर  रवी भाऊ पडोळे स्वाभिमानी शेतकरी संघटना अमरावती तर प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट नंदकिशोर शेळके, सुप्रसिद्ध कवी गुल्हेर फेम नरेंद्रजी इंगळे प्रसिद्ध कवी अनंत राऊत प्रसिद्ध कवी जनार्दन जी भगत नरेशजी ठाकरे डॉक्टर शरद बावनेर अनिल तोंडे, सौ देवश्री ठाकरे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी शिवसेना सौ वर्षा ताई विसर्डे पिसोडे शिवसेना महिला आघाडी तसेच कार्यकारणी सदस्य संचालक डॉक्टर बाबुराव शेळके, कल्याणी ताई सोनवणे, बबनराव उबाळे अनिल पटवी, सुनील सदर दिनकर राऊत, मंडळाचे उपाध्यक्ष डी आर सरप, विजय हरणे, देवानंद गहिले, दीपक दांदळे, गणेश तिव्हाने आदींची मंचावर उपस्थिती होती
वधू-वर परिचय मेळाव्याचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव गजाननराव इंगळे, गजाननराव खारोडे कार्याध्यक्ष यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवदास गोंड व चंचल येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन वारकरी अध्यक्ष नियोजन समिती यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तालुक्याचे पदाधिकारी व नियोजन समितीचे पदाधिकारी सदस्य संजय शेळके, अनंत गावंडे, राजू चिखले, मनोज कोरडे, अंबादास शेळके, सुभाष लांडे, विठ्ठलराव उबाळे, सुदेश शेळके, संजय बागलकर, डॉक्टर काशिनाथ पाटेकर, दिनेश मुळे, महादेवराव काळे, श्याम बोर्डे, राजू भगत, विनोद वरखडे, प्रकाश अहिर, राजू वहिले, प्रकाश थेटे ,अक्षय इंगळे, राजेश गावंडे ,प्रसिद्धी प्रमुख किसनराव मोरे यांच्यासह मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
0 9 4 8 7 9
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *