चिखली विधान सभेतील 13 ग्रामीण व 5 इतर जिल्हा मार्गांना प्रमूख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता..

Khozmaster
5 Min Read
आ.सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांना यश
चिखली
 विधान सभा मतदार संघातील 13 ग्रामीण आणि 5 ईतर जिल्हा मार्गांना दर्जोन्नत करून प्रमुख जिल्हा मार्गां म्हणून मान्यता मिळाल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यामुळे चिखली विधान सभा मतदार संघातील या दर्जोन्नत झालेल्या इतर जिल्हा मार्ग झाल्याने अनेक गावे आता ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावरून प्रमुख जिल्हा मार्गावर आली असल्याने या रस्त्यांची आता जलद गतीने सुधारणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधान सभा मतदार संघातील 1) काटोडा, हिवरखेड,आमखेड, एकलारा,पांढरदेव,करतवाडी, टाकरखेड रामा-५४८ CC ला जोडणारा रस्ता(ता.चिखली)  एकूण लांबी १४.७०० किमी , 2) प्रजीमा -३३ ते तेल्हारा शेलगाव जहागीर मुंगसरी खैरव गांगलगाव रोहडा ते रा.म.मा. ७५३ Aला जोडणारा रस्ता (ता.चिखली)  एकूण लांबी २०.५०० कि.मी , 3) राष्ट्रीय महामार्ग ७५३ A ते येळगाव साखळी बु., शिरपूर, सोनेवाडी, सावरगावं डुकरे रस्ता रस्ता (ता.चिखली)  एकूण लांबी ११..०० कि.मी , 4) राष्ट्रीय महामार्ग ७५३ एम ते करडी कुंभमेळा, कुलमखेड, मौढाला म्हसला बु.रस्ता राष्ट्रीय महामार्ग ७५३ MC ला जोडणारा रस्ता (ता. बुलडाणा) ११.५००किमी ,5) भडगाव, चांडोळ , बोधेगाव ,जांब,ते कोसेगाव रस्ता (ता. बुलडाणा)१६.९०० किमी या ग्रामीण आणि ईतर जिल्हा मार्गांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 30 नोव्हेंबर 2022 रोजी मान्यता मिळाल्याने आणि तसा शासन निर्णय झाल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने चिखली विधान सभा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्गामध्ये एकूण ७४.६०० किमीने वाढ झाली आहे.
आ.सौ.श्वेता ताई महाले यांनी अगोदर प्रमूख जिल्हा मार्गांना राज्य महामार्गाची मिळविली आहे मान्यता
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील प्रमुख जिल्हा दर्जोन्नत राज्यमार्ग म्हणून करण्याबाबत
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत 1) धोडप पेठ एकलारा अंबाशी चंदनपुर मेरा बु. राहेरी रस्ता , 2) बुलडाणा सागवन रायपुर पि. सराई भारज खापरखेडा गोपी मराडखेडा ते सावरखेडा रस्ता. ,
 3) प्रजिमा- २१ ते देवपुर दुधा माळवंडी केसापूर पांग्री शिरपूर केळवद किन्होळा धोडप राज्यमार्ग – २७४ ला जोडणारा रस्ता या तीन जिल्हा मार्गांना रस्त्यांना राज्य महामार्गांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे चिखली विधान सभा मतदार तीन प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्ग तर आता 13 ग्रामीण व 5 ईतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळाला आहे.
रस्ते दर्जा वाढीत आ सौ श्वेता ताई महाले यांनी घडविला इतिहास चिखली विधान सभा मतदार संघातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सौ श्वेता ताई महाले पाटील या आमदार झाल्यानंतर त्यांनी रस्ते विकासाची धमनी असल्याने रस्ते विकासाकडे विशेष लक्ष देण्याचे काम केले . यामध्ये योजना बाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करणे , ग्रामीण रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग करणे, इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गांचा तर प्रमुख जिल्हा मार्गांचा राज्य महामार्गात दर्जवाढ करण्याचे नियोजन केले . तशा प्रकारचे परिपूर्ण प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आले. त्यामुळे आ सह श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत 130 किलोमिटरच्या रस्त्यां राज्य महामार्ग तर आता 76.400 किलोमिटच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा मिळाला आहे . एकाच आर्थिक वर्षात 206.400 किलोमीटरच्या रस्त्यांची दर्जावाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी रस्त्यांच्या दर्जा वाढीमध्ये इतिहास घडविला आहे. अजूनही रस्त्यांची दर्जा वाढ होणार आहे.आ .सौ .श्वेता ताई महाले पाटील चिखली विधान सभा मतदार संघातील वरील दर्जावाढ झालेल्या रस्त्यांच्या व्यतिरिक्त आणि अगोदर मिळालेल्या रस्त्याच्या दर्जा वाढ व्यतिरिक्त अजूनही रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले होते. यामध्ये दोन गावांना जोडणारे रस्ते योजना बाह्य रस्ते, तसेच काही ग्रामीण आणि ईतर जिल्हा मार्गांचे प्रस्ताव सादर केलेले होते. परंतु मागील आघडी सरकारने राजकिय आकसापोटी या  प्रस्तावांना मान्यता दिली नव्हती . परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्याने विकास कामांची गती तर वाढलीच परंतू रखलेल्या कामांना सुद्धा मान्यता मिळत आहे. त्या अनुषंगाने चिखली विधान सभा मतदार संघातील राहिलेल्या रस्त्याची सुद्धा लवकरच दर्जावाढ होणार असून त्यामुळे मतदार संघातील दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त करुन या रस्त्यांच्या दर्जा वाढीस मान्यता मिळाल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *