पारायण….

Khozmaster
1 Min Read
पारायण ..
बावन्नश्लोकी रांजण
करती अमृत शिंपण
नित्य नेमाने रे करावे
गुरू चरित्र  पारायण 
वाचनवाटता कठीण
चालते केवळ श्रवण
तितकेचं मिळे  फळ 
तितके सक्षम द्रावण
अवतरणिका हे  सार
श्लोकांचे होई स्मरण
संक्षिप्त चरित्र  जाण
गुरू चरित्र  पारायण
हे ही ना जमले  जरी
जायचे गुरुला  शरण
भक्त काम  कल्पद्रुम
ध्यावे  सद्गुरू चरण
अंतर्बाह्यसुचिर्भुत हो
एकाग्रता मनतल्लीन
गुरुला  सारे  सोपवून
चरणी जीवन हे लीन
किंतु परंतु  हेतू नको
श्रध्दा भाव सत्कारण
जीवशीव जडता नाते
सद्गुरू करे उध्दारण
– हेमंत मुसरीफ पुणे.
  ९७३०३०६९९६ 
0 9 4 6 3 7
Users Today : 51
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *