दिवाणी न्यायालय मेहकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली

Khozmaster
2 Min Read
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील हिऱ्यामधील मौल्यवान हिरा – न्यायाधीश चंदगडे

सतीश मवाळ मेहकर

मेहकर न्यायालय येथे 66 वा महापरिनिर्वाण
दिनानिमित्त या क्रांतिसूर्याच्या तेजस्वी कार्य-विचारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवल करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन सामुहिक अभिवादन केले. व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.अनिल पवार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा.चंदगडे जिल्हा न्यायाधीश -१,मा.शेख साहेब दिवाणी न्यायाधीश,मा.केंद्रे साहेब दिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तर,मा.थोरात मॅडम दिवाणी न्यायाधीश व मा.जाधव दिवाणी न्यायाधीश तर बार असोसिएशनचे सचिव ऍड.बाहेकर होते. थोर महामानव संविधानाचे जनक,महिलांना तसेच सर्व समाजाला समान हक्क मिळवून देणारे, गोरगबांचे कैवारी, हजारो वर्षापासून दारिद्र्याच्या, अंधश्रद्धेच्या, आणि गुलामगिरीच्या खाईत पडलेल्या दिनदुबळ्या समाजाला, मजुराला, शोषितांना, शेतकऱ्यांना, स्त्रियांना, समतेचा व स्वातंत्र्याचे व मतदानाचा हक्क देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, तत्वज्ञ, जागतिक दर्जाचे अर्थशात्रज्ञ, कायदेपंडित, लेखक, उत्तम संसदपटू, स्रीउद्धारकर्ते, स्वतंत्र भारताचे पाहिले कायदेमंत्री, बॅरिस्टर, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे 6 डिसेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातला काळालाही स्तब्ध करणारा दिवस..! म्हणजे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चारित्र्यावर जिल्हा न्यायाधीश चंदगडे यांनी बोलतांना अनेक उदाहरणे दिली व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक विचार आहे आणि जगातील हिऱ्यामधील मौल्यवान हिरा आहे.त्याचबरोबर दिवाणी न्यायाधीश जाधव तसेच,ऍड.संजय नवघरे, ऍड.सरदार, ऍड.ठाकरे, ऍड.तुपे, ऍड.अनंतराव वानखेडे, ऍड.धोंडगे यांनी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजकार्या बद्दल व त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल आपले विचार मांडले व
सामुहिक आदराजली वाहण्यात आली. यावेळी असोसिएशनचे सर्व वकील मंंडळी सदस्य व तालुका विधी सेवा समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार समाधान पदमणे तसेेेच न्यायालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड.संजय नवघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड.सरदार यांनी मानले या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *