भाजपा च्या वतीने नवनिर्वाचित  सरपंच चा सत्कार

Khozmaster
1 Min Read
माळेगावची ग्रामपंचायत बिनविरोध
सतीश मवाळ मेहकर
तालुक्यातील दुर्गम भागातील आणि आदिवासी बहुल असलेली माळेगावची ग्रामपंचायत गावातील नागरिकांनी एकत्र येऊन एकोप्याने ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना बिनविरोध निवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेऊन गावातील वैयक्तिक वाद बाजूला ठेवून गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले त्याचप्रमाणे सरपंच एक व सदस्य  साठी  प्रभागांमध्ये एक अर्ज दाखल करण्याचे सर्वानुमते ठरले गेले.सरपंच पदासाठी प्रकाश अंभोरे यांनी अर्ज दाखल केला सदस्य साठी सतिश गाढवे सौरभ शिंदे वामनराव गाढवे पुजाताई लठाड चंद्रकला लोखंडे पुजा घोकले लंकाबाई चोंडकर चंद्रकला गाढवे शितल वानखेडे यांनी अर्ज सादर केले आहे.सरपंच व  नऊ सदस्य आता अविरोध निवडून आले असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी यांची अधिकृत घोषणा केली होईल.माळेगाव सारख्या दुर्गम भागातीलआदिवासींच्या गावाणे आपली ग्रामपंचायत अविरोध करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे गावातील तरुण मंडळी मध्ये आनंद निर्माण झाला व  सर्व भागांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.मेहकर तहसील मध्ये भाजपा तालुका अध्यक्ष अँड शिव ठाकरे व पदाधिकारी यांनी जाऊन पेढे भरून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याा.
0 9 4 6 8 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *