संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा पो.स्टे.चे ठाणेदार श्री अनिल बेहेरानी यांचा सत्कार

Khozmaster
1 Min Read

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा पो.स्टे.चे ठाणेदार श्री अनिल बेहेरानी यांचा सत्कार…

नांदुरा/प्रतिनिधी(श्रीकांत हिवाळे):-  नांदुरा पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित ठाणेदार  श्री अनिल बेहेरानी यांनी पदाभर स्वीकारल्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा याची प्रचिती नांदुरा शहरासह संपूर्ण तालुक्याला आली.पदभार स्वीकारताच आपल्या धडाकेबाज कामगिरीची छाप टाकत नांदुरा शहरातील मोठी समस्या बनलेले अतिक्रमण हटविले.यामुळे मुख्य रस्ते दुतर्फा मोकळे झाले.यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन रहादरिरील अडथळा दूर झाला.तसेच अवैध धंद्यांना जरब बसविली.विद्युत तार चोरी प्रकरणाचा १७ तासात छडा लावून साडेचार लाखाच्या मुद्देमालासह आरोपींना गजाआड केले.विशेष म्हणजे अनिल बेहेरानी हे पूर्णवेळ पोलीस स्टेशनमधेच असतात यामुळे ठाणेदार श्री अनिल बेहेरानि यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी ठाणेदार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुष्पगुच्छ तसेच संभाजी ब्रिगेड नावाचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड जील्हासचिव डॉ.शरद पाटील,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका मार्गदर्शक विनोद वनारे,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील,शहराध्यक्ष हिमांशू अवचार,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,संतोष गायगोळ,गजानन ठाकूर,भगीरथ मनस्कार,विशाल इंगळे,दर्शन ढवळे,पत्रकार पवन चव्हाण,ॲड.सागर सुर्यवंशी,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी लोणवाडी शाखाध्यक्ष अभिषेक सोळंके,पवन गिरी,जय चिकटे,महेश घुळे उपस्थित होते.

0 9 4 6 8 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *