शकुंतला बचाव सत्याग्रह समितीची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक समितीचे आयोजक आमदार हरीश पिंपळे यांच्या नियोजनानुसार शुक्रवारी ता 16 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील हेंडज जवळच्या हॉटेल तुलसी येथे घेण्याची निश्चित झाले आज सत्याग्रही यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या सत्याग्रहाच्या उपस्थिती घेण्यात आलेल्या बैठकीत अचलपूर मुर्तीजापुर यवतमाळ धावणारी मात्र गत साडेतीन वर्षापासून बंद असलेली शकुंतला रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याचा आजवरचा प्रयत्नांना आढावा घेऊन पुढील रणनीती ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हा लोहमार्ग सीपीआर कडून भारतीय रेल्वेच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे तसेच या लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने संरक्षण लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार हरीश पिंपळे त्यांना पाठविलेल्या पत्रातून कळविले आहे त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली या एकूण पार्श्वभूमीवर शुक्रवार ता 16 आमदार हरीश पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली व पश्चिम विदर्भातील सत्याग्रहाच्या उपस्थित होणाऱ्या सभेत पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
