अकोट : विशाल गवई अकोट
तालुक्यातील आकोलखेड येथील फुले, शाहु, आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आकोलखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सकाळी ११ वाजता करण्यात आले होते.रक्तदान शिबीराची सुरुवात आरोग्य अधिकारी आनंद पारसकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले.यावेळी दिगंबर पिंप्राळे,अ.जहिद अ.शहिद, आरोग्य सेवक प्रविण चापके, आरोग्य सेविका माधुरी इचे,डाॅ.सोहेल यांची प्रमुख उपस्थिती होती.रक्तदान शिबीरात सदानंद सिरसाट,श्रीकांत फुलारी,उमेश खैरे, प्रविण तायडे,श्रीधर तळोकार, राहुल मोहोड,अशोक टिपले,सचिन सुपासे, नागोराव नगराळे,करुणेश मोहोड,कल्पेश चोंडेकर,प्रितेश रंदे, राजेंद्र काळे,विजय पाटील,प्रदिप सिरसाट आदींनी रक्तदान केले.रक्त संकलन करण्यासाठी अकोला येथील स्त्री रुग्णालयाची चमूने केले.चमूमध्ये डाॅ.कुंदन चव्हाण,श्रीकांत थोरात,हर्षल बोदडे,नंदकिशोरे परनाटे,गौरव शेंडे आदींनी सेवा दिली.शिबीराच्या यशस्वितेसाठी ललित नगराळे,अनुज सिरसाट,योगेश काळे,देवानंद टिपले,सागर गावंडे,विपूल जवादे,विशाल नगराळे,पुष्कर किटके,रोहित नगराळे,संघर्ष मुनेश्वर,सुमित नगराळे,रतन खैरे,सुजित सिरसाट,नागेश लोखंडे,मंगेश सिरसाट,स्नेहल शंभरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
Users Today : 15