राज्यातील सात लक्ष पेंशनर्स चे प्रश्न लक्ष्यविधीने अधिवेशनात मांडून सोडविणार–आ,रमेश पा,बोरनारे

KHOZ MASTER
1 Min Read
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
रवैजापूर राज्यात सरकारी,निमसरकारी,जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांचे सात लक्ष सेवा निवृत्त
कर्मचारी आहेत यांचे अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न
येत्या हिवाळी अधिवेशनात लक्ष्यविधी ने मांडून ते मार्गी लागण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे वैजापूर-गंगापूर विधानसभा संघाचे आ,रमेश पा,बोरनारे यांनी मंगळवार(ता,०६)रोजी पेंशनर्स च्या पदाधिकाऱ्यांना  आश्वासन दिले,राज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा संघटनचे अध्यक्ष वसंतराव सबनीस,सचिव नामदेव घुगे, वैजापूर शाखेचे
अध्यक्ष धोंडीरामसिह राजपूत,पैठण शाखेचे कार्याध्यक्ष एस, आर,मोरे,व जिल्हा शाखेचे पी,टी, कुलकर्णी यांनी आमदार बोरनारे यांना मागण्यांचे निवेदन दिले त्यावेळी त्यांनी या मागण्याची लक्ष्यवेधी
करणार असल्याचे सांगितले,या मागण्या केंद्र सरकारी
निवृत्त कर्मचाऱ्या प्रमाणे,₹हजार प्रत्येकी प्रत्येक महिन्याला मिळणे,पेंशनर्सचे उर्वरित सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते त्वरित अदा करावे,३०जुंन
ला सेवा निवृत्त झालेल्यांना एक जुलै ची वेतन वाढ चे
आदेश शासनाने काढावे,सेवा निवृतांची मे२०२२ची
उपदान व अंशराशिकरण मिळावे,मंत्रालयात पेंशनर्स चा स्वतंत्र विभाग असावा,महागाई भत्ता ची थकीत रक्कम अदा करावी व राज्यातील जि,प,सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या पांच तारखेच्या
आत सेवा निवृत्ती वेतन मिळावे,वरील सर्व मागण्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असे असं,बोरनारे
यांनी सांगितले(फोटो कॅप्शन-आ, बोरनारे यांना मागण्याचे  निवेदन देताना वसंत सबनीस,श्री, मोरे,श्री घुगे, धोंडीराम राजपूत, पी, टी, कुलकर्णी.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *