पहूरला सावित्रीबाई  फुले विद्यालयात  महापरिनिर्वाण दिन

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्तअभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहुर पेठचे माजी उपसरपंच रवींद्र मोरे हे होते .प्रारंभी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . गौरव शेलवडकर , रूपाली माळी , मोनाली बनकर , रुचिता पाटील , प्राजक्ता तायडे , अक्षय जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र मोरे आणि समता शिक्षक परिषदेचे जिल्हा सचिव शंकर भामेरे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , उपमुख्याध्यापिका के . ए . बनकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुवर्णपदक विजेत्या वर्षा राऊत , नंदिनी सोनवणे , आकांक्षा जाधव , तृप्ती घोंगडे आणि जागृती चौधरी या कराटेपटूंचा सन्मान करण्यात आला .सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले . चंदेश सागर यांनी आभार मानले .
0 9 4 7 7 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *