ओबीसीचे  जनक डाॅ बाबासाहेब आंबेडकर

Khozmaster
2 Min Read
हि. रा. गवई. चिखली
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन सभा घेण्यात आली. त्यावेळी आपले विचार मांडतांना हि. रा. गवई सर म्हणाले बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसींचे जनक व भारतदेशाचे जननायक आहेत ते दलीतांचे नव्हे तर देशाचे कैवारी होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे जेष्ठ नागरीक माजी सरपंच शालीकराम कर्‍हाडे तर प्रमुख मार्गदर्शक साहीत्यीक, लेखक, कवी हि. रा. गवई सर, तर प्रमुख उपस्थीतीत शेषराव बोर्डे, गोपाल नेवरे, ज्ञानेश्वर कर्‍हाडे, ऋणानुबंध समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ लताबाई डोंगरदिवे हे होते.बाबासाहेबांचे कार्य हे फक्त दलीतांपुरतेच नसुन देशातील प्रत्येक नागरीकांच्या कल्याणासाठी असल्यामुळे ते देशाचे खरे जननायक आहेत असे प्रतीपादन प्रमुख मार्गदर्शक हि.रा. गवई यांनी केले. तसेच कु. प्रियंका वानखडे, विशाखा डोंगरदिवे, दिक्षा डोंगरदिवे, सांची डोंगरदिवे, नंदनी डोंगरदिवे, पुजा डोंगरदिवे, श्रेया डोंगरदिवे, आचल डोंगरदिवे, दिक्षीता कर्‍हाडे, दिव्या कर्‍हाडे, प्रणव डोंगरदिवे या विदयार्थांनी बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाचे व्यस्थापक प्रशांतभैया डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले यावेळी फकीरबा डोंगरदिवे, विशाल डोंगरदिवे, रीतेश डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, सुरज डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, आकाश डोंगरदिवे, करण सरोदे, अमोल डोंगरदिवे, कौसाबाई डोंगरदिवे, कांताबाई डोंगरदिवे, आशाबाई डोंगरदिवे, संगीता वानखडे, दुर्गा साबळे, सुषमा डोंगरदिवे, नलीनी गवई.वत्सलाबाई गवई यांच्यासह बौध्द उपासक उपासीका उपस्थित होते.
0 9 4 6 8 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *