प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहरालगत असलेल्या पातोंडा येथून दोन मोबाईल चोरटयाने लंपास केला . त्यानंतर मोबाईल मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा येथील आनंद अजीत सोनवणे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरटयांनी ५ हजार रुपये किंमतीचा व अनिल माळी यांच्या घरातून ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लंपास केला ही घटना आनंद सोनवणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडले..याप्रकरणी आनंद अजीत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आकाश रमेश पवार रा . रेवानगर ( ता . तळोदा ) याच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणत भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार मंगलसिंग कोकणी करीत आहेत .
Users Today : 18