शहादा पोलीस ठाण्यासमोरील घरात घरफोडी.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहादा शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटयाने ७० हजार ५३ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे . याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहादा शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कृष्णाईनगर येथे किसन सखाराम शिंदे यांचे घर असून अज्ञात चोरटयाने घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत ७० हजार ५३ रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले . याप्रकरणी किसन सखाराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४ , ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि संदिप आराक करीत आहेत .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *