महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा खून..

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे झोपडीत झोपलेल्या महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अज्ञाताने मारहाण केली . यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहादा तालुक्यातील खेडदिगर गावातील संताजी तोलकाटा जवळील मोकळया जागेत असलेल्या झोपडीत एक महिला झोपली होती . त्यावेळी भगवान कोळी याने आत प्रवेश करत महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला . याकारणावरून अज्ञाताने भगवान कोळी याला हाताबुक्यांनी लाथांनी पाठीवर छातीवर व कंबरे वर मारहाण केली.यात रक्तस्त्राव झाल्याने उपचारा दरम्यान भगवान ईश्वर कोळी ( ३५ ) रा.खेतीया ( ता.पानसेमल म.प्र . ) याचा मृत्यू झाला .
या प्रकरणी पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपीविरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *