येणाऱ्या पिढीतील कोणत्याही मुलींना गर्भाशयाचे कॅन्सर होणार नाही यासाठी प्रयत्न करणार आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील…

Khozmaster
5 Min Read
स्व. दयासागरजी महाले यांच्या जयंती निमित्त आयोजीत गर्भाशय मुख प्रतिबंधक लसीकरणास अभुतपुर्व प्रतिसाद चिखली :
धकाधकीचे जीवन , व्यायामाचा अभाव , बदलती जीवनशैली, महिलांमध्ये कॅन्सरचे विशेषतः गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या गर्भाशय मुखाच्या कॅन्सर मध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे . भारतात महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग क्रमांक 2 वर आहे. दरवर्षी भारतात जवळपास 1 लाख 25 हजार नवीन केसेसची नोंद होते व त्यापैकी जवळपास 70 हजार मृत्यू होतात. या कॅन्सरचे मुख्य कारण आहे HPV [ Human Papilloma Virus] हा विषाणू आहे . यापैकी 80% सर्व्हायकल कॅन्सर हे HPV 16/18 याने होतात व आपण याच विषाणूला प्रतिबंधक लस या शिबिरात देत आहोत. हा एकमेव सर्व्हायकल कॅन्सर हा विषाणू मुळे होत असल्याने त्याची लस उपलब्ध आहे. ही लस मोठ्या प्रमाणात महिलांना देऊन त्यांचे किमान या कॅन्सर पासुन तरी रक्षण होणार असल्याने जास्तीत जास्त मुली व महिलांना ही लस उपलब्ध करून देऊन
येणाऱ्या पिढीतील कोणत्याही मुलींना गर्भाशयाचे कॅन्सर होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी स्व. दयासागरजी महाले यांच्या जयंती निमित्त आयोजीत गर्भाशय मुख प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले. दि 7/12/2022 रोजी चिखली येथे स्व. दयासागरजी महाले यांच्या जयंती निमित्त गर्भाशय मुख प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि 27 मार्च 2022 रोजी झालेल्या लसीकरण शिबिरातील 925 महिलांना दुसऱ्या डोस आणि नविन 9 ते 18 वयोगटातील मुलींसाठी लस ऊपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, आधार बहुद्देशीय संस्था, भारतीय सिंधू सभा , चिखली मेडिकल असोसिएशन व तोरणा महिला सहकारी बँक यांच्या वतीने  आयोजित  या शिबिराच्या पहिल्या दिवशी चिखली तालुक्यातील ………. मुली व महिलांना लस देण्यात आली.या शिबिराला मुली व महिलांचा अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . केवळ चिखलीच नव्हें तर विदर्भात पहिल्यांदाच या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या गर्भाशय मुख कर्क रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिराला मिळालेल्या प्रतिसादामुळे कर्क रोगाबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती असून या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा जागरूकता निर्माण झाल्याचे दिसत आहे.गर्भाशय मुख कर्क रोगाला शून्यावर आणून ठेवणार
डॉ धनंजया सारनाथ कार्यकारी संचालक कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनक र्करोगामध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग क्रमांक 2 वर आहे. या कॅन्सरच्या उच्चाटनासाठी CPPA आणि आदित्य बिर्ला ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे लसीकरण करीत आहोत. मी या क्षेत्रात अनेक महानगरामध्ये हजारों महिलांचे लसीकरण केले आहे. चिखली मध्ये मिळालेला प्रतिसाद आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिसाद परंतू आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात लस घेण्यासाठी महिलाचा मिळालेला प्रतिसाद हा सर्वात मोठा होता. हा प्रतिसाद बघता सर्वायकल कॅन्सरच्या उच्चाटसाठी अजुन कार्य करणे गरजेचे असून ते कार्य सदोदित करून या सर्वायकल कॅन्सर नावाच्या राक्षसाला शून्यावर आणण्यासाठी सतत कार्य करीत राहणार असल्याचे प्रतिपादन ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे प्रतिपादन धनंजया सारनाथ कार्यकारी संचालक कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन यांनी केले उर्वरित राहिलेल्या महिलांनी लाभ घेण्याचे आवाह मागील शिबिरासाठी 1150 मुली व महिलांनी पहिला डोस घेतलेला आहे . त्यातील 19ते 45 या वयोगटातील 925 महिलांनी 27 मार्च ला पहिला डोस घेतलेला आहे. उद्या दि 8 डिसेंबर रोजी शिबिर सुरू असून राहिलेल्या महिलांनी आपला दुसरा घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून भारत माता , संत झुलेलाल आणि स्व दयासागरजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.  महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अजाबराव वसु यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ भारती गुरुदासानी यांनी केले.
मंचावर डॉ प्रतापसिंह राजपूत , रामदास भाऊ देव्हडे , भाजपा शहर अध्यक्ष पंडीतदादा देशमुख तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, जिल्हा अध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक आघाडी शे अनिस , सौ विमल ताई देव्हडे ,  गोविंद देव्हडे , सुदर्शन खरात, विजय नकवाल , अनुप महाजन , कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन संचालक भावना शर्मा , तालुका आरोग्य अधिकारी डॉ सांगळे , ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद, डॉ अमोल राजपूत , डॉ वायाळ ,भारतीय सिंधु सभेच्या सदस्य सौ खुशी भोजवाणी , श्रीमती शोभा गुरूदासानी , सौ दुर्गा मुलचंदाणी , श्रीमती लक्ष्मी मुलचंदाणी , जिनल भोजवाणी , कविता भोजवानी ज्योती गोलाणी , माया गोलाणी , हेमा गुरूदासाणी चिखली मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती . या महिलांनी स्वयंसेवक म्हणुन काम केले. यावेळी भारतीय सिंधु सभेच्या वतीने आ सौ श्वेता ताई महाले व कॅन्सर पेशंट अड असोसिएशनच्या संचालिका यांचा सत्कार करण्यात आला.
0 9 4 6 8 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *