सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज बुधवारी ( ता . ७ ) जामनेर येथील शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले व पुढील उपचारासाठी आवश्यक त्या सूचना केल्या .
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी योग्य आहार , नियमित व्यायाम केला पाहिजे असे सांगून फास्ट फूडचे सेवन न करता विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहायला हवे , असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ . विजया पाटील यांनी केले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ . धनंजय पाटील ,औषध निर्माता परमेश्वर पाटील , आरोग्य सेविका मोनाली सावळे , यांची उपस्थिती होती . महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक युसूफ बाबा , उपमुख्याध्यापिका कल्पना बनकर यांच्या हस्ते सर्वप्रथम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले . सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले .
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .
Users Today : 5