चिखली


चिखली विधान सभा मतदार संघातील चिखली तालुक्यातील तीन गावांनी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्राम पंचायत निवडणुका होउ न देता अविरोध केल्याने आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते नव निर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.चिखली मतदारसंघातील पेनसावंगी, मुंगसरी आणि गट ग्राम पंचायत घानमोड, मानमोड करत वाडी , ढालसावांगी येथील नागरिकांनी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्राम पंचायत निवडणुका अविरोध करून समाजाला एक आदर्श निर्माण करून दिला आहे. “ग्राम पंचायत अविरोध करा आणि एकावन्न लाख मिळवा आ .सौ .श्वेता ताई महाले यांनी केले होते आवाहन गावातील राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये , गावातील वातावरण चांगले रहावे , कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी , निवडणुकीसाठी उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये निवडणूका आहेत त्या गावातील नागरिकांनी *ग्रामपंचायतच्या निवडणुका अविरोध करा आणि एकावन्न लाखाचा निधी मिळवा* ” असे जाहीर आवाहन आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी महाले एका प्रसिध्दी पत्रकान्वये ३ डिसेंबर रोजी केले होते.
यावेळी पेंनसावगी येथील अविरोध सरपंच सौ.सविताताई सुरेश शेजोळ सदस्य सौ.रोहिणी रामेश्वर वायाळ , सौ.रुख्मिना प्रदीप पाटील , सौ आशा विठ्ठल शिंदे , सौ.ज्योती गजानन शेजोळ , रमेश लक्षिमन पडघान ,अनिल आश्रुबा शेजोळ , दीपक आश्रुबा पांचाळ तथा विशेष सहकार्य मा.सरपंच अशोक पाटील, उपसरपंच गजाननभाऊ मोरे, मा.सरपंच समाधानभाऊ वायाळ,गजानन कोल्हे मुंगसरी येथील योगिता पवार यांची सुद्धा अविरोध सरपंच पदी तर सदस्य म्हणून लक्ष्मण भिसे, वर्षा गाडेकर, ज्ञानेश्वरी काटकर, शिवाजी इंगळे, योगेश साळोख, वनिता ठोंबरे, माया भाकरे यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच गट ग्रामपंचायत करतवाडी, घानमोड, मानमोडच्या सरपंचपदी सौ. शारदा परमेश्वर म्हळसणे तसेच सरपंच राजू श्रीपत वाघ , सदस्य पदी सौ पुष्पा संजय लडके, सौ नंदा गणेश वाघ,
शेख रिजवान शेख शफीक, संदिप सानप, सदाशिव जाधव, गफ्फुर खा राजदार खा,
तसेच ग्राम पंचायत सदस्य श्री. अंकुश रमेश म्हळसणे, सौ. संगीता सुभाष जाधव (शि सौ. सिंधु बबन म्हळसणे, सौ. आशा अनंता तायडे,अमरदीप प्रल्हाद दांडगे, संतोष विजय सुरडकर, सौ. वंदना मधुकर सपकाळ या ग्राम पंचायत सदस्यांचेही अभिनंदन करून गावाच्या चौफेर विकासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी अशोक पाटील शेजोळ , अनिलभाऊ जाधव पाटील , दत्ताभाऊ जाधव, विकास मोरे, गणेश पाटील,परमेश्वर म्हळसणे, दिनकर थिगळे, समाधान जाधव, अच्युतराव पाटील, दत्ता जाधव, समाधान जाधव, श्री. सुभाष जाधव, अमोल पाटील,
पंढरी पाटील मा.सरपंच,गजानन रोकडे लक्षिमन पडघान, रामेश्वर सोनुने ,नारायण शेजोळ, रामेश्वर मोरे, नंदकिशोर पांचाळ ,अर्जुन येळवांडे
व पेंसवांनगी,करतवाडी, घानमोड, मानमोडचे समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 38